महाराष्ट्र

घोड नदीवरील ‘म्हसे–अण्णापूर’ पूल अर्धवट; 

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24} घोड नदीवरील ‘म्हसे–अण्णापूर (प्रजिमा–१९८)’ या महत्त्वाच्या पुलाचे काम मंजुरीनंतर पाच वर्षांनंतरही अर्धवट व बंद अवस्थेत असल्याचे उघडकीस आले आहे. सन २०२१ मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पासाठी ₹१०.२५ कोटींचा निधी उपलब्ध असताना, सन २०२३ मध्ये उद्घाटन करूनही प्रत्यक्षात काम ठप्प असल्याने सार्वजनिक निधीच्या अपव्ययाचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी केला आहे.त्यांनी सांगितले पुलाचे की खांब व संरचना अर्धवट अवस्थेत असून, कामासाठी आणलेले लोखंडी स्टील साहित्य उघड्यावर पडून गंजलेले आढळत आहे. हे साहित्य भविष्यात वापरल्यास सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हा पूल पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, कामगार व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणी शासन निर्देशानुसार अनिवार्य असलेला प्रोजेक्ट इन्फॉर्मशन बोर्ड लावलेला नसून, ही बाब पारदर्शकतेचा अभाव व नियमभंग दर्शवते.

काम मुद्दाम थांबवून भविष्यात खर्चवाढ अथवा सुधारित अंदाजपत्रक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम), विभागीय आयुक्त, मुख्य अभियंता (प्रादेशिक), अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. पूल अर्धवट ठेवणे ही जनतेशी फसवणूक आहे.याप्रकरणी तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी व काम पूर्ण करावे अशी मागणी निलेश वाळुंज यांनी केली आहे.

दरम्यान, या बाबींची तातडीने दखल न घेतल्यास जनहितासाठी शिरूर तहसील कार्यालय येथे लोकशाही मार्गाने आंदोलन अथवा उपोषण करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

घोडनदी वरील म्हसे अण्णापुर पुलाचे काम अर्धवट व प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर श्रीपाद बालशटवार यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की मी नुकताच येथील कामाचा चार्ज घेतला आहे. पुलाचे कामास या ठिकाणी असणारे पाणी व अधिकच्या पावसामुळे उशिर झाला. पण आता लवकरच पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button