विशेष
Related Articles
Check Also
Close
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}अखिल भारतीय मराठा महासंघ, शिरूर तालुका यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. हा जयंती सोहळा सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शामकांत वर्पे यांनी सांगितले.
माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले,तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य पदाधिकारी गुलाब दादा गायकवाड,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील व नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठा महासंघ, शिरूर तालुका यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

