महाराष्ट्र

माझ्यातील बाईला मी स्वतः जन्म दिला.मला माझे बाईपण, मानवी भावना सहजपणे सांगता येण्यासाठी ही खूप खडतर प्रवास करावा लागतो : समाजिक कार्यकर्त्या व लेखिका दिशा पिंकी शेख

oplus_131106

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} माझ्यातील बाईला मी स्वतः जन्म दिला.मला माझे बाईपण, मानवी भावना सहजपणे सांगता येण्यासाठी ही खूप खडतर प्रवास करावा लागतो. मला बाईपण सिद्ध करण्यासाठी लढावेच लागले. ही परिस्थिती जिने माझ्यावर आणली ती सामाजिक व्यवस्था ही माझी खरी शत्रू आहे. आणि तिच्याविरुद्ध मला लढावेच लागेल असे ट्रान्सजेंडर संदर्भात काम करणा-या सामाजिक कार्यकर्त्या लेखिका कवियत्री दिशा पिंकी शेख म्हणाल्या.

     चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील विद्यार्थिनी मंच व विदयार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने ‘जागर नवविचारांचा’ व्याख्यानमालेत सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका, कवयित्री,पारलिंगी हक्क चळवळीतील अग्रणी दिशा पिंकी शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, उपप्राचार्य हरिदास जाधव, विद्यार्थिनी मंचच्या समन्वय डॉ. क्रांती पैठणकर, सामाजिक कार्यकर्त्या उषा वाखारे, डॉ. वैशाली साखरे आदी उपस्थित होते.

 समाजात जगत असताना ट्रान्सजेंडरला एक माणूस म्हणून जी अवहेलना होते, ट्रान्सजेंडरला जीवन जगताना आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये ज्या अनेक समस्या त्यांना भेडसावतात त्या उपस्थित करत त्या म्हणाल्या की समाजाकडून सहानभूतीची अपेक्षा नाही तर समाजाने समानतेने, मानवतेने पहावे, वागवावे असे सांगून ट्रान्सजेंडर ही माणूसच असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी निकम म्हणाले की, नव विचार आपल्यापर्यंत येणे ते समजून घेणे महत्त्वाचे आहे . विद्यार्थ्यांनी माणूस व समाज समजून घ्यावा. समाजातील ट्रान्सजेंडर यांचे वास्तव ही समजून घ्यावे.ट्रान्सजेंडरकडे माणूस म्हणून पाहावे असे ही त्या म्हणाल्या.

प्राचार्य डॉ. के. सी मोहिते यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयार्थी विकास अधिकारी डॉ. अजित चंदनशिवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. क्रांती पैठणकर यांनी केले.आभार डॉ. भोईटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button