Uncategorizedराष्ट्रीय

रिल्स पेक्षा रियालिटीत जगा : परमवीरचक्र प्राप्त सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव

१९९९ च्या कारगिल युद्धातील त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान 'परमवीर चक्र' प्रदान .

oplus_131090
oplus_131090
oplus_131090
oplus_131090
oplus_131090
oplus_131090
oplus_131090
oplus_131090

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम }: जीवन खूप सुंदर आहे. हे जीवन सकारात्मकतेने जगा त्याच बरोबर रील्स पेक्षा रियालिटी मध्ये जीवन जगा असे सांगून रणक्षेत्रावर जिंकण्यासाठी मनावर विजय मिळवा असे आवाहन परमवीरचक्र प्राप्त सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव यांनी केले.

हिलिंग लाईव्हस या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने परमवीर चक्र प्राप्त योगेंद्र सिंह यादव यांचे शिरूर मधील शालेय विद्यार्थ्यान साठी ज्ञानगंगा विश्व विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी हिलिंग लाईव्हसचा जानवी दीदी, संतोष सांबारे, ज्ञानगंगा विश्व विद्यालयचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेराम घावटे, विश्वस्त अमृतेश्वरी घावटे, प्रा.सुधीर शिंदे,सामाजिक कार्यकर्त्या जाईताई खामकर व माजी सैनिक आदी उपस्थित होते.

यादव म्हणाले की भारताच्या भूमीत व छत्रपती शिवाजी महराज यांच्या जन्मभूमीत जन्म घेणे ही भाग्याची अभिमानाची गोष्ट आहे. जीवन जगताना ध्येय समोर ठेवून जगा. सन १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजविणारे वीर अब्दुल हमीद यांच्या पराक्रम व शौर्य पाहून प्रभावित झालो होतो. सैनिक व्हावे असे स्वप्नं होत. त्यानंतर सैन्यात सहभागी झालो. सैनिकावर राष्ट्राचा विश्वास व भरोसा असतो. मी शिक्षक ही असल्याचे त्यानी सांगितले.

जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट ही वेळ आहे. त्यामुळे आजची कामे आज करा,वेळेचा अपव्यय करू नका. जीवन सरळ नाही.जीवन म्हणजे संघर्ष आहे. राष्ट्र व समाज यांच्या प्रगती साठी शांतता महत्वाची आहे. शांतता असेल तरच प्रगती व विकास होवू शकतो.

दिवस रात्र सीमेवरती सैनिक रक्षण करत असतात म्हणून आपण सर्वजन सुरक्षित पणे जीवन जगू शकतो.

कारगिल युद्धा बाबत सांगताना ते म्हणाले की सन १९९९ ला शून्य अश सेल्सिअस तापमान असताना १३५०० फुट अधिक उंच पहाडी वर सैनिक युद्ध लढत होते. २२ दिवस लढाई ते लढले. त्यात काही सैनिक शहीद झाले. देशातील नागरिकांच्या युद्धा व्यतिरिक्त इतर आपत्तीत ही सैनिकांवर विश्वास असतो.

टायगर हिल १७ हजार हून अधिक फुट उंचावर आहे. टायगर हिल वर ऑक्सिजनचे प्रमाण विरळ होत जाते. टायगर हिल परत घेण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या. माझ्या ही या टीम मध्ये सहभाग होता. आमच्या टीमने रात्रीचा वेळेस डोंगर चढण्यास सुरुवात केली. कारण दिवसा शत्रू पाहू शकत होता.रात्री शत्रू आम्हास पाहू शकत नव्हता. दिवसभर चूपचाप पडून राहयचो. .चेहराची स्कीन फाटून रक्त येत होते .तरी चालत राहत होतो. गोळीबार सुरु होता. या कश्याचा ही विचार न करता चालत राहिलो दोन दिवस झाल्यावर तिसरा दिवशी तिथे पोहोचलो. सकाळ होत होती.पहाडा वर दोरीवरून चढत असताना गोळीबार सुरु होता. काही जण आमच्यातील शहीद झाले. आम्ही सात जन वर पोहोचलो आणी शत्रूवर फायरिंग सुरु केले. आणी शत्रूचे सैन्य मारले. त्यांची बंकर नष्ट केले. तेथून टायगर हिल ५० ते ६० मीटर लांब होते. आम्ही सात जण व समोर शत्रूची सैनिकांची पलटण होती. परन्तु आम्ही धैर्य व धाडसाने पुढे सरकलो. व लढत राहिलो पाच तास नंतर चित्र बदलले होते. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. आमच्या वर गोळीबार सुरु होता. आम्ही रक्ताच्या थारोळ्यात होतो. पाकिस्तान सैन्याची खात्री झाली की आम्ही मरण पावलो आहे. पाकिस्तानी अधिकारी यांनी आमच्या कडील शस्त्रे घेण्यास पाकिस्तानी सैनिकास सांगितले . मी स्वंत चुपचाप पडून राहिलो होतो. पाकिस्तान सैनिक माझ्या जवळ आल्यावर त्याला कळून चुकले कि मी जिवंत आहे. माझी पॅन्ट फाटली होती. माझ्या खिशातील नाण्यावरती गोळ्या लागल्याने मी वाचलो होतो. मी क्षणांची उसंत न घेता माझ्याकडील हॅन्ड ग्रँड पाकिस्तानी सैनिकावर फेकले. त्याचे धड शरीरा पासून वेगळे झाले. त्यानंतर पाकिस्तान सैन्यास मी जिवंत असल्याचे समजल्यावर फायरिंग सुरू झाले मी ही फायरिंग सुरु केले आणि चार पाच पाकिस्तान सैनिकास यमसदनी पाठविले.चार ते पाच मिटर त्याच्या मागे गेलो असे यादव म्हणाले.

त्यानंतर रांगत रांगत शहीद झालेल्या भारतीय सैनिका पाशी पोहोचलो. शहीद झालेल्या सैनिकाच्या कडे पाहत होते डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. कुणाच्या हात कुणाच्या पाय तर काही जणांच्या शरीराचे भाग नव्हते. त्यानंतर खाली ५०० मीटर अंतरावर येत आपल्या भारतीय सैनिकाकडे आलो आणि झालेल्या सर्व प्रकार सांगितला. तिथे माझ्यावर प्रथोपचार करण्यात आले आणि नंतर श्रीनगर येथे दवाखान्यात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर कळाले की आपल्या सैनिकांनी टायगर हिल वर चढाई करून करून टायगर हिल ताब्यात घेतले हे ऐकल्यावर आनंदाश्रू आल्याचे यादव म्हणाले.

कारगिलच्या युद्धात ५२७ जण शहीद झाले असून शहीद झालेल्या ३०० हून अधिक सैनिकांच्या कुटुंबीयाची भेट घेतली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ राजे.राम घावटे म्हणाले की सैनिक आपल्या देशासाठी लढत असतात. देशाची सेवा करत असतात.त्यांच्याविषयी कृतज्ञता व सन्मानाची भावना ठेवणे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्तविक अमृतेश्वरी घावटे यांनी तर स्वागत प्रा. डॉ. राजेराम घावटे यांनी केले. तर आभार प्रा. सुधीर शिंदे यांनी मानले.

                  चौकट

सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव (परमवीर चक्र) हे भारतीय भूदलातील एक अत्यंत शूर आणि सन्मानित अधिकारी आहेत. १९९९ च्या कारगिल युद्धातील त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान ‘परमवीर चक्र’ वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी प्रदान करण्यात आला.युद्धभूमीवरील त्याचे अनुभव ऐकताना विद्यार्थी भारावून गेले होते.

भारत माता की जय च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी यादव यांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button