धार्मिंकविशेष

शिरूरमध्ये गणेश जयंती निमित्ताने हलवाई चौक येथे गुरुवार दि २२ जानेवारी रोजी धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन 

सायंकाळी सहा पासून हलवाई चौक येथे महाप्रसादाचे आयोजन

शिरूर दिनांक (वार्ताहर) गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शिरुर शहर परीसरात मोठ्या उत्सहात गणेश जयंती साजरी करण्यात आली . शहरातील प्रसिद्ध असणा-या हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा हलवाई गणेशाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती. नवसाला पावणा-या अशी ख्याती असणा-या हलवाई गणेशास विविध चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे. गणेश जयंती निमित्त हलवाई गणेश मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. त्याच बरोबर संगमरवरी असणा-या मंदिरावर आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली होती . गणेश जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . हलवाई गणेश मित्र मंडळाने काही वर्षापूर्वी गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून त्यातून वाचलेल्या खर्चातून परिसरात ९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सह महिलासाठी महाआरती व विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जात असतात. दरम्यान गणेश जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती संभाजी गणेश मित्र मंडळ संभाजीनगर (हुडको कॉलनी) यांच्या वतीने माहेर संस्था तसे सिंधूताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालय याठिकाणी भोजन देण्यात आले . सुवर्ण युग गणेश मित्र मंडळ , युवा संघर्ष गणेश मित्र मंडळ मुंबई बाजार , आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक ,छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळ लाटेआळी येथे ही गणेश जयंती निमित्त गणेश याग ,भजन, महाआरती महाप्रसाद अश्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुंभार आळीतील विठठल मंदिरातील श्री गणेशाच्या मुर्तीची भव्य अशी मिरवणुक गणेश जयंतीनिमित्त काढण्यात आली यात मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या .दरम्यान अष्टविनायका पैकी एक असणा-या रांजणगाव गणपती येथील महागणपतीचा मंदिरात ही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. फोटो ओळी हलवाई गणेश मुर्ती
नवसाला पावणारा हलवाई गणेश

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शहरातील श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी गणेश जयंती विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम व महाप्रसादाचे आयोज करण्यात आले आहे.

  २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता गणेश मंदिरात धार्मिक विधी व अभिषेकाने महोत्सवाची सुरुवात होणार असून दिवसभर भक्तिमय वातावरण राहणार आहे.

महोत्सवानिमित्त गणेशपूजन, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेत असतात. सामाजिक ऐक्य, भक्ती आणि परंपरेचे जतन हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

हलवाई गणेश मंदिर परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी व महाप्रसाडासाठी नागरिकांनी व गणेशभक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हलवाई चौक येथील श्रीमंत हलवाई गणेश मित्र मंडळ हे शिरुर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यातील महत्त्वाचे गणेश मंडळ आहे. मंडळाच्या वतीने सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असुन मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी असे ५० वे वर्षं साजरे करत आहे.

सन १९७५ मध्ये हलवाई व्यवसायिक सुभाष पुजारी, अरुण काळे, शंकर परदेशी, भोलेनाथ परदेशी, रामलाल परदेशी ,अरुण मुसळे , दिलीप मुथ्था , गणपतराव पांढरकामे , सुभाष घोडके, कोळपकर बंधू, यांनी व त्यांच्या सहका-यांनी श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ अर्थात त्यावेळच्या महात्मा गांधी गणेश मित्र मंडळाची स्थापना केली . काळांतराने हेच मंडळ श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ या नावाने ओळखले जावू लागले .पुणे जिल्हा ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात येणारे सन -२०२४ चे गणराया ॲवार्ड प्रथम क्रमांक प्रप्त केलेले हलवाई चौक गणेश मित्र मंडळ सातत्याने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे आयोजन करतात . मंडळाने काही वर्षापूर्वी विसर्जन मिरवणुक साध्या पध्द्तीने काढून त्यातून वाचलेल्या पैसातुन परिसरात सी. सी. टी .व्ही कॅमेरे बसविलेले आहेत . त्याखेरीज मंडळाच्या उत्सव मंडप खड्डे विरहित असा आहे . शहरात मंडळाच्या वतीने महिलांसाठी सामुहिक महिला आरती शिरूर मध्ये सर्व प्रथम सुरु करण्यात आली .त्याखेरीज पर्यावरण संरक्षण ,निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा या मोहिमे अंतर्गत गणेशोत्सव काळात महिला आरतीला महिलांना तुलसीच्या रोपासह देशी झाडांची रोपे भेट दिली जातात . वाचन संस्कृती वाढविण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्याना पुस्तके वाटण्यात येतात. .गणेशोत्सव काळात महत्वाची भुमिका बजाविणारे पोलीस बांधव व नगरपरिषद स्वच्छता विभागातील कर्मचारी यांच्या विशेष सन्मान कृतज्ञता सोहळ्या दवारे मंडळाच्या वतीने केला जातो. त्याच बरोबर आरोग्यशिबीराचे ही आयोजन केले जाते. आरोग्यपर जनजागृती व प्रबोधनाचे ही कार्यक्रम घेतले जाते . शहरात गणेश जयंती निमित्त महाप्रसाद ही मंडळाचा वतीने सुरु करण्यात आला .स्वच्छता अभियानातही मंडळाचा सक्रीय सहभाग असतो . गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य व ड्रेसेस ही देण्यात येतात .

 शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षकांना ‘ प्रेरणादायी शिक्षक ‘पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येते . आता पर्यत २५ हून आधीक शिक्षकाना सन्मनित करण्यात आले आहे .कोरोनोच्या काळात शहरातील गरजूना अन्नधान्यचे कीट, सांगली व महाड परिसरातील पूरग्रस्ताना अन्न धान्य व अन्य वस्तूंची मदत मंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे .

लोकवर्गणीतुन हलवाई गणेशास चांदीचे आभूषणे करण्यात आली आहे . श्री. गणेश जयंतीस हजारोंच्या संख्येने महाप्रसादासाठी भाविक हलवाई गणेश येथे येत असतात . शहरात गणेश जयंतीच्या दिवशी मोठया प्रमाणावर महाप्रसाद वाटप करण्याची परंपरा ही सर्वप्रथम हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने सुरू केली.

दरवर्षी पौराणिक ,धार्मिक ,अथवा सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा असून सर्वधर्मीय नागरीक मोठया संख्येने मंडळात कार्यरत आहे .साई गणेश , विठ्ठल गणेश, बालाजी गणेश, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झाडे लावा, झाडे जगवा, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी समर्थ गणेश, पोटु पतलू, असे विविध देखावे मंडळाचे गाजलेले देखावे आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस यांच्या वतीने मंडळाच्या कार्याची दखल घेवुन मंडळास बक्षिस देवुन सन्मानित करण्यात आलेले आहे .१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झेंडावंदन व मुलांना खाउवाटप ही केले जाते .

त्याच बरोबर विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ही कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .

यंदा मंडळाचा उत्सवाचे ५० वर्ष असून या वर्षात मंडळास प्रथम क्रमांकाचे गणराया ॲवार्ड जाहीर झाले आहे.

 सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त विविध धार्मिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

   सुवर्णमहोत्सवी वर्षांत हलवाई चौकाच्या राजाच्या समोर सामुदायिक अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात महिलांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग घेतला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी येथील सिद्धीच्या पहाडावर सिद्धेश्वर वनराई व सह्याद्री वनराई परिसरात दिवसभर श्रमदान करून शेकडो देशी वृक्ष लावले. परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. भजन सम्राट बबलु दुग्गल यांच्या साई भजन संध्या या सोहळ्यातही परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साईंवरील गीते यावेळी सादर करण्यात आली.

श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. संजीवनी ब्लड बॅंकेच्या सहाय्याने आयोजित केलेल्या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिरात १५० हून अधिक नागरीकांची रक्तदाब, मधुमेह, ह्रदय तपासणी करण्यात आली. नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी व परिसरातील हलवाई व्यावसायिकांची या शिबिरांतर्गत तपासणी करण्यात आली. गौतम मुनीजी महाराज यांनी शिबिरात भेट देऊन सदीच्छा व्यक्त केल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button