महाराष्ट्र

पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम, 24}शिरूर तालुक्यातील कवठे येमाई तील फत्तेश्वर बंधाऱ्याजवळील घोडनदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे कवठे यमाई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हरीदास भट्ट (वय ४२, सध्या रा. हडपसर, पुणे, मूळ रा. कवठे यमाई, ता. शिरूर) हे मुलींना पोहण्यासाठी घेऊन फत्तेश्वर बंधाऱ्याकडे गेले होते. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते घोडनदीच्या पाण्यात बुडाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी गावातील नागरिकांना दिली.

यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. सुमारे अकराच्या दरम्यान नदीतील महादेवाची पिंड व नंदी जवळील पाण्यात काही अंतरावर योगेश भट्ट आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या प्रकरणी दीपक महाधवराव रत्नपारखी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली असून, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ७२/२०२६, बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वारे करीत असून, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button