राजकीय

शिरूर नगरपरिषद निवडणूक भाजपाच्या उमेदवारीसाठीच्या मुलाखतीस इच्छुकांची मोठी गर्दी

oplus_131074

शिरूर:  { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषद निवडणूक संदर्भात अनेक अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. पालिकेतील सत्ताधारी शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी उद्योग व्यवसायाचा झालेल्या विस्तारा मुळे आपण नगरपालिका निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करीत आपली भूमिका स्पष्ट केली. तर लोकशाही क्रांती आघाडीचे रविंद्र धनक यांनी ही लोकशाही क्रांती आघाडी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. या झालेल्या राजकीय घडामोडी नंतर शिरूर शहराचे राजकीय समीकरणे प्रचंड वेगाने बदलेले व राजकीय पक्षांच्या भूमिकेस निर्णयाक महत्व प्राप्त झाले आहे.

कुठल्या ही परिस्थितीत निवडणूक लढवणार असा चंग बांधलेले इच्छुक हे शिरूर शहर विकास आघाडीचा उमेदवारी करीता मोठ्या प्रमाणावर इच्छुक होते. विकास आघाडीची उमेदवारी म्हणजे विजयाची हमखास हमी अशी सर्वांची खात्री होती. परंतु विकास आघाडीच निवडणूक मैदाना बाहेर राहणार असल्याचे जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी आपल्या मोर्चा राजकीय पक्षाकडे वळविला आहे. राज्यात सत्ताधारी असणारे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस ( अजित पवार) शिवसेना (शिंदे ) या पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी गर्दी होवू लागली आहे.  दरम्यान आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिरूर नगरपरिषदसाठी इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती राजभोग या हॉल मध्ये घेण्यात आल्या. यावेळी मुलाखती करीता इच्छुकांनी समर्थकांसह प्रचंड गर्दी केली होती. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पक्षाचे निवडणूक निरीक्षक श्रीनाथ भिमाले, गणेश ताठे,जिल्हा परिषद माजी सदस्या जयश्री पलांडे, शिरूर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मुलाखती साठी ७२ हून अधिक जणांनी मुलाखती दिल्या यात अनेक माजी नगरसेवक यांचा ही समावेश होता अशी माहिती भाजपचे सरचिटणीस विजय नर्के यांनी दिली. भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार की मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस सह अन्य पक्षा समवेत लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button