Uncategorizedक्राईम

पोलिसांकडून तीन जणांवर तडीपारीची कार्यवाही

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम )
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना शिरूर पोलीसांनी केले दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. १) अनिल शिवाजी काळे रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे. २) रोहित प्रमोद उर्फ बाळासाहेब कर्डीले रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे. ३) महेश मच्छिंद्र गायकवाड रा. लाटेआळी शिरूर ता. शिरूर जि. पुणे अशी त्यांची नावे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले की शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०१८ ते सन २०२४ या कालावधीमध्ये दरोडा घालणे, भांडणे मारामारी, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, साधे गंभीर दुखापती करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, जातीवाचक शिवीगाळ करून वेळोवेळी सराईतपणे वेगवेगळया प्रकरणामध्ये गुन्हे करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार १) अनिल शिवाजी काळे रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे. २) रोहित प्रमोद उर्फ बाळासाहेब कर्डीले रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे. ३) महेश मच्छिंद्र गायकवाड रा. लाटेआळी शिरूर ता. शिरूर जि. पुणे. यांचेवर कायदयाचा वेळीच प्रतिबंध होवुन कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावी व सर्वसामान्य माणसांना निर्भयपणे स्वतःचे जीवन जगता यावे या करीता वरील तिघा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक शिरूर यांना सुचना दिली होती. त्या अन्वये पोलीस निरीक्षक शिरूर यांनी सदर वरील इसमांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा ५६ प्रमाणे हददपार होण्याकरीता प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी पुणे यांना सादर केला होता.
त्यावर सुनावणी होवुन मा. पुनम अहीरे, उपविभागीय दंडाधिकारी पुणे विभाग पूनम अहिरे यांनी १) अनिल शिवाजी काळे, २) रोहीत प्रमोद कर्डीले ३) महेश मच्छिंद्र गायकवाड यांनी केलेल्या गुन्हयांची गंभीर दखल घेवुन सदर गुन्हेगारांना २ वर्षाकरीता पुणे जिल्हा (पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहर हददीसह) अहिल्यानगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतुन तडीपार केले आहे. यापुढील कालावधीतही व आगामी कालावधीत संपन्न होणारे जिल्हा परीषद, पंचायत समीती, नगरपालीका निवडणुक ही शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता तसेच शिरूर पोलीस ठाणे हददीत शिरूर तालुक्यामध्ये व औदयोगीक क्षेत्रांमध्ये दहशत व गुंडगिरी करणा-यांवर अशाच प्रकारे कठोर कार्यवाही करणार असल्याचे सांगीतले आहे.

जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष व समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे उपाध्यक्ष संजय तुकाराम बारवकर यांना डेली न्यूज पोस्ट टीमच्या वतीने  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वरील आरोपीतांवर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून तडीपार / हददपार करणेकामी अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाल पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस अमंलदार सचिन भोई तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार महेश बनकर तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, अंबादास थोरे, अजय पाटील, निखील रावडे यांनी कामकाज पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button