क्राईम

२० ते २५ वर्ष वयाचा युवकाचा मृतदेह आढळला विहीरीत .


शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
विहीरीचा पाण्यात २० ते २५ वर्ष अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे .
ढोकसांगवी , ता . शिरुर येथील विहीरीत हा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीकेश काळुराम मलगुंडे, वय २८ वर्षे, व्यवसाय शेती व माथाडी कामगार, रा. मलगुंडे वस्ती, धनगरवाडा, ढोक सांगवी ता. शिरूर, जि. पुणे यांनी याबाबत खबर दिली आहे .
मलगुंडे हे ढोकसांगवी तील जमीन गट नं. ५०१ मध्ये असलेल्या विहीरीवरील पाण्याची मोटार चालु करणेसाठी गेले असता विहीरीतील पाण्यात एक अनोळखी इसम मयत अवस्थेत तरंगत असलेला दिसला. याबाबत पोलीस पाटील दिपक मलगुंडे यांना फोन करून याबाबतची माहिती दिल्यावर पोलीसांनी फायर ब्रिगेडचे मदतीने सदरचे प्रेत विहीरीचे बाहेर काढले .सदरचे प्रेत हे अनोळखी पुरूषाचे , वय अंदाजे २० ते २५ वर्षाचे असून प्रेत सडलेले आहे . चेहरा ठिकठिकाणी जलचर प्राण्यांनी खालेला असून पाण्यामुळे हातापायाचे तळवे पांढरे पडलेले आहेत .अंगात फिक्कट जांभळे रंगाचा फुल बाहयाचा शर्ट असुन निळे रंगाची कलर गेलेली जीन्स पॅन्ट असुन सदर पॅन्ट नाडीने कंबरेस बांधलेली असुन आतमध्ये काळे रंगाची जॉकी कंपनीची अंडवेअर आहे.डोकीस टक्कल, दाढी मिशा नसल्याचे पोलीसांनी सांगितले.
याबाबत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय कर्डिले तपास करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button