Uncategorizedविशेष

मानवी स्वभावाचे सूक्ष्म कंगोरे आणि मनोवृत्तींचे बारकावे प्रभावीपणे उलगडून दाखवणारे साहित्यिक म्हणजे विल्यम शेक्सपिअर : प्राचार्य पद्माकर पुंडे

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मानवी स्वभावाचे सूक्ष्म कंगोरे आणि मनोवृत्तींचे बारकावे प्रभावीपणे उलगडून दाखवणारे साहित्यिक म्हणजे विल्यम शेक्सपिअर, असे प्रतिपादन माजी प्राचार्य व व्याख्याते पद्माकर पुंडे यांनी केले.

जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिरूर नगरपरिषद व शिरूर रिक्रिएशन क्लब अॅन्ड लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तद्वार वाचनालय’ उपक्रमांतर्गत ‘शेक्सपिअरच्या नाटकातील आपली माणसे’ या विषयावर पुंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अॅड. सुभाष प्रतापराव पवार होते.

पुंडे म्हणाले, “मानवी नातेसंबंध बदलत असतात. आजचे मित्र उद्या शत्रू होऊ शकतात, तर शत्रू मित्र बनू शकतात. त्यामुळे वैर टिकवू नये आणि मैत्री तुटल्याने खचून जाऊ नये.” मानवी स्वभाव समजून घेणे आवश्यक असून, ते न समजल्यास अनेक गैरसमज निर्माण होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेक्सपिअर यांच्या हॅम्लेट, रोमिओ अँड ज्युलिएट, ज्युलियस सीझर आणि ओथेलो या नाटकांतील पात्रांचे उदाहरण देत त्यांनी मानवी स्वभावातील प्रेम, महत्त्वाकांक्षा, संशय, लोभ, सत्तालालसा यांसारख्या प्रवृत्तींचा ऊहापोह केला. कटकारस्थानी, दयाळू, हेकेखोर, उपभोगवादी अशा विविध स्वभाववैशिष्ट्यांचे चित्रण शेक्सपिअर यांनी समर्थपणे केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात अॅड. सुभाष पवार म्हणाले की प्राचार्य पद्माकर पुंडे यांची इंग्रजी भाषा साहित्य व नाटके यांच्यावर प्रभुत्व असून शेक्सपिअरच्या साहित्यावर त्यांचा मोठा अभ्यास आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र धनक यांनी केले.

 सूत्रसंचालन राजेंद्र मोरे यांनी केले, तर हर्षद शिर्के यांनी पुंडे यांचा परिचय करून दिला. स्वागत डॉ. दीपक गायकवाड, मोहम्मद हुसेन पटेल व ग्रंथपाल  कल्पना मोरे यांनी केले. आभार प्रा.सतीश धुमाळ यांनी मानले.

यावेळी शिरीष लोळगे, विवेक बगाडे, प्रदीप बारवकर, प्रा. चंद्रकांत धापटे, प्रा. शशिकांत जाधव, विजया टेमगिरे, साबीरभाई शेख, नितीन गायकवाड, नंदकुमार पिंजरकर, सतीश गवारी, माजी नगरसेविका माया गायकवाड, डॉ. वैशाली साखरे, मुख्याध्यापक गंगाधर तोडमल आदी उपस्थित होते.

डेली न्यूज पोस्ट २४ च्या वतीने लोकजागृतीचे अध्यक्ष ओम प्रकाश सतीजा यांना भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button