महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश शिरूर मध्ये, दर्शनासाठी नागरिकांची गर्दी

oplus_131074
oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 }शिरूर शहरात आज शोकाकुल वातावरण अनुभवायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनानंतर त्यांचा अस्थिकलश शिरूरमध्ये आणण्यात आला. या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अश्रूंनी डोळे पाणावलेल्या वातावरणात अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.शिरूर शहरातील एस.टी. बसस्थानक परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात फुलांनी सजवलेल्या वाहनातून अस्थिकलश आणण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसरात शोकमय शांतता पसरली होती. “अजितदादा अमर रहें”च्या घोषणा आणि ओलावलेल्या डोळ्यांतून व्यक्त होणारे दु:ख, हे दृश्य प्रत्येकाचे मन हेलावून टाकणारे होते.

या श्रद्धांजली कार्यक्रमास नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे, शहराध्यक्ष व माजी सभापती शरद कालेवार, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार, जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर, बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, सभापती स्वाती साठे, महिला व बालकल्याण खात्याच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, माजी सभापती अविनाश मल्लाव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रुतिका झांबरे, रंजन झांबरे, योगेश जामदार, ॲड. भगवान दिघे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे म्हणाले,“शिरूर तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीत अजितदादा पवार यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला.

शिरूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला असून, पुढील काळात शिरूर तालुक्यातील विविध भागात हा अस्थिकलश नेण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून अजितदादांच्या कार्याला सलाम केला.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

अजितदादा पवार यांच्या निधनाने शिरूर तालुक्यासह संपूर्ण राज्याने एक कर्तृत्ववान, विकासप्रिय आणि लोकनेतृत्व गमावले असून, त्यांच्या आठवणी कायम जनमानसात जिवंत राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button