धार्मिंकराष्ट्रीयविशेष

गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्ट चा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम  सर्टिफाय हायस्कुल व न्हावरा फाटा येथील निवासी मूक बधिर शाळेतील विदयार्थ्यांना स्नेहभोजन

उपक्रमाचे १८ वे वर्ष

शिरूर दिनांक (वार्ताहर) गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शिरुर शहर परीसरात मोठ्या उत्सहात गणेश जयंती साजरी करण्यात आली . शहरातील प्रसिद्ध असणा-या हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा हलवाई गणेशाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती. नवसाला पावणा-या अशी ख्याती असणा-या हलवाई गणेशास विविध चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे. गणेश जयंती निमित्त हलवाई गणेश मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. त्याच बरोबर संगमरवरी असणा-या मंदिरावर आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली होती . गणेश जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . हलवाई गणेश मित्र मंडळाने काही वर्षापूर्वी गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून त्यातून वाचलेल्या खर्चातून परिसरात ९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सह महिलासाठी महाआरती व विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जात असतात. दरम्यान गणेश जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती संभाजी गणेश मित्र मंडळ संभाजीनगर (हुडको कॉलनी) यांच्या वतीने माहेर संस्था तसे सिंधूताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालय याठिकाणी भोजन देण्यात आले . सुवर्ण युग गणेश मित्र मंडळ , युवा संघर्ष गणेश मित्र मंडळ मुंबई बाजार , आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक ,छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळ लाटेआळी येथे ही गणेश जयंती निमित्त गणेश याग ,भजन, महाआरती महाप्रसाद अश्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुंभार आळीतील विठठल मंदिरातील श्री गणेशाच्या मुर्तीची भव्य अशी मिरवणुक गणेश जयंतीनिमित्त काढण्यात आली यात मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या .दरम्यान अष्टविनायका पैकी एक असणा-या रांजणगाव गणपती येथील महागणपतीचा मंदिरात ही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. फोटो ओळी हलवाई गणेश मुर्ती
oplus_131106
oplus_131074
oplus_131074
oplus_131074

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट 24}: दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने भक्तीबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला . “गणरायाच्या चरणी सेवा हीच खरी पूजा” या भावनेतून मंडळाने समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले.या उपक्रमांतर्गत विशेष मुलींच्या सर्टिफाय हायस्कूल, पाबळ फाटा (नगरपालिका समोर) येथे तसेच न्हावरा फाटा येथील निवासी मूक बधिर शाळेत मंडळाच्या वतीने स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण देणे आणि गणेश जयंतीचा उत्सव सामाजिक बांधिलकीतून साजरा करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सेवाभावी कार्यातून मानवतेचा खरा अर्थ अधोरेखित होतो असे मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे यांनी सांगितले.

दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात एक छोटासा आनंदाचा क्षण जरी आपण देऊ शकलो, तरी तीच गणरायाची खरी कृपा समजतो. असे रणजित गायकवाड यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे, माजी अध्यक्ष रणजित गायकवाड, सिंकदर मण्यार, प्रा. सतीश धुमाळ, बाळुशेठ उर्फ प्रेम मुसळे, माजी उपसरपंच गणेश खोले, सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते अशोक भोसले शक्ती ग्रुपचे अस्लम सय्यद, रवि आढाव आदी उपस्थित होते.

भक्ती, सेवा आणि संवेदनशीलतेचा संगम असलेल्या या उपक्रमातून गणेश जयंती साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button