किराणा व्यवसायिक सचिन कोठारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 } शहरातील प्रसिद्ध किराणा व्यवसायिक सचिन रुपचंद कोठारी (वय ४८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने शिरूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सचिन कोठारी हे मनमिळावू, शांत स्वभावाचे आणि मदतीस तत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. आपल्या व्यवसायासोबतच ते परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत. समाजाशी असलेली त्यांची आपुलकी आणि सहकार्याची भावना यामुळे ते सर्वांच्या परिचयाचे व विश्वासाचे होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबावर कोसळलेल्या या अचानक दुःखाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
दरम्यान, विद्याधाम प्रशाला दहावी बॅच १९९३ च्या वतीने सचिन कोठारी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. मित्रपरिवाराने त्यांच्या आठवणी जागवत श्रद्धांजली अर्पण करताना भावना अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सचिन कोठारी यांच्या अकाली निधनाने शिरूरने एक सामाजिक जाणिव जपणारा, संवेदनशील नागरिक गमावला असून त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
अंत्ययात्रा – गुरुवार दिनांक ५ फेबूवारी २०२६रोजी सकाळी १० वाजता श्री हाईट्स रामलिंग रोड येथील राहत्या घरापासून अमरधाम स्मशानभूमी येथे जाईल.