उच्च न्यायालयाचा फसवणूक करणाऱ्या आरोपीला दणका; जामीन नाकारला
फिर्यादी राजेंद्र बारगुजे यांची माहिती.
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर तालुक्यातील आर्थिक फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी दिपक भिमराव बारवकर याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा सशर्त जामीन देण्यासही न्यायालयाने स्पष्ट नकार दिला असल्याची माहिती फिर्यादी राजेंद्र अशोक बारगुजे यांनी दिली.
बारगुजे यांनी आरोपीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली असून, आरोपीने विश्वासघात करत मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने केस क्रमांक ABA/1475/2025 मध्ये आरोपीचा जामीन अर्ज फेटाळत कोणतीही सवलत न देण्याचा आदेश दिला. विशेष म्हणजे, आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे बारगुजे म्हणाले.
दरम्यान, फिर्यादी बारगुजे यांनी प्रशासनाकडे आरोपीस तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपीवर त्वरित कारवाई झाल्यास सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

सचिन कोठारी यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 व विद्याधाम प्रशाला सन १९९३ दहावीच्या बॅचच्या वतीने भावपूर्ण आदरांजली