Uncategorized

बारावीच्या परीक्षेसाठी शिरूर तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर एकूण ५३५४ विद्यार्थी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. पुढील करिअरच्या दृष्टीने निर्णायक ठरणाऱ्या या परीक्षेसाठी शिरूर तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर एकूण ५३५४ विद्यार्थी बसले आहेत. यामध्ये शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सर्वाधिक २०८० विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

पहिल्याच पेपरमुळे आज सकाळी परीक्षा केंद्रांवर उत्सुकता आणि थोडीशी तणावाची छाया दिसून आली. अनेक पालक आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते. काहीजण आत्मविश्वास वाढवणाऱ्या सूचना देत होते, तर काहींनी यशासाठी शुभेच्छा दिल्या.

बोरा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, उपप्राचार्य हरिदास जाधव, पर्यवेक्षक वणवे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रवींद्र धनक, प्रा. रतनकुमार ससाणे, प्रा. बाळासाहेब नान्नोर, प्रा. नंदकुमार पाटील, प्रा. शरद रणदिवे, प्रा. निर्मला संकपाळ, प्रा. यशस्विता वारे, प्रा. रामदास चव्हाण, प्रा. प्रसाद शिंदे आदी उपस्थित होते.तालुक्यातील इतर परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थीसंख्या पुढीलप्रमाणे आहे :

न्हावरा येथील श्री मल्लिकार्जुन ज्युनिअर कॉलेज – ३७७,

तळेगाव येथील रायकुमार गुजर प्रशाला – ६१८,

शिरूर येथील विद्याधाम प्रशाला – ६६७,

जातेगाव येथील संभाजीराजे कनिष्ठ विद्यालय – ६०६,

मांडवगण फराटा येथील वाघेश्वर विद्याधाम कनिष्ठ महाविद्यालय – २६८,

पिंपळे जगताप येथील वसंतराव डावखरे ज्युनिअर कॉलेज – ७३८ विद्यार्थी.

  • परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडत असून सर्व केंद्रांवर आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याची माहिती तालुका शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button