क्राईम
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मलठण (ता. शिरूर) येथील मलठण–रांजणगाव रोडलगत असलेल्या कॅनॉल रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीचे दोन ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारांसह ऑईलची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे
. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत इंद्रजित दामोदर खरसाडे (वय ३९, व्यवसाय वरिष्ठ तंत्रज्ञ, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 115/2026 भा.वि.का.क 136 सह भा.न्या.सं 324(4) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सुमारे ९० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व १८० लिटर ऑईल असा अंदाजे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तसेच पालरेश्शा ट्रान्सफॉर्मर (डी.टी.सी. क्र. 0555535, के.व्ही. 100/22) मधील सुमारे ६० किलो तांब्याच्या तारा व १५० लिटर ऑईल असा अंदाजे ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.एकूण सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
