निधन वृत्त
व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव यांचे निधन
शोकाकूल वातावरणात शिरुर येथे अंत्यसंस्कार
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट -२४ टीम )पूर्वमुखी हनुमान गणेश मित्र मंडळ सोनार आळी चे कार्यकर्ते व व्यवसायिक भरत शंकरराव जाधव वय -३७ यांचे निधन झाले . 
त्याच्या पश्चात आई , पत्नी , १ मुलगा , तीन बंधू असा परीवार आहे . मनमिळावु व इतराना मदत करण्यात व सामाजिक कार्यात भरत जाधव यांच्या सक्रिय सहभाग असायचा .श्रीराम सेनेचे संस्थापक सुनील जाधव , व्यवसायिक सचिन जाधव , संदिप जाधव यांचे ते बंधु होत . समस्त सकल मराठा समाज संघचे विश्वस्त अविनाश जाधव यांचे ते चुलत बंधू तर व्यवसायिक व सामजिक कार्यकर्ते रामभाउ इंगळे यांचे ते मामे बंधु होत .

जाधव यांच्यावर शोकाकूल वातावरणात अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , शिवसेनेचे तालुका प्रमुख पोपटराव शेलार , गणेश जामदार , माजी सरपंच वर्षा काळे , विठ्ठल घावटे , प्रकाश थोरात , माजी नगरसेवक विनोद भालेराव , प्रा. सतीश धुमाळ आदीनी श्रध्दांजली वाहिली .
चौकटअवघ्या तीन दिवसापूर्वी भरत जाधव यांचे पिताश्री शंकरराव जाधव यांचे निधन झाले होते . आज त्याच्या सावडण्याचा विधी होता आणि आजच भरत जाधव यांचे निधन झाले . जाधव कुटुंबातील दोन सदस्याचे अवघ्या तीन दिवसाच्या अंतरात निधन झाल्याने जाधव परीवारावर दु :खाचा मोठा डोंगर कोसळला .

.