महाराष्ट्र
शिरूर नगरपरिषद सफाईच्या ठेक्या वरील कामगारांच्या किमान वेतनाच्या मुद्दा ऐरणीवर. उपोषणकर्ते महिबूब सय्यद यांची राज्य शासनाच्या किमान वेतन आयोग सल्लागार समितीचे अध्यक्ष गणेश ताठे यांनी घेतली भेट


दरम्यान, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांच्या आमरण उपोषणाला ठेका सफाई कामगारांचा वाढता पाठिंबा मिळत असून किमान वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली. सध्या किमान वेतनानुसार पगार मिळत नसल्याने तसेच वेतन वेळेवर होत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली.
योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देणे, गौण खनिज उत्खनन प्रकरणी दंड वसूल करणे, किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे आणि शहरातील धोकादायक विद्युत वाहिन्या हटविणे आदी मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.

