Uncategorizedराष्ट्रीय

शिरूरची लेक पुण्याची महापौर मंजुषा नागपुरे यांच्या शिरूर मध्ये नागरी सत्कार मानपत्र देऊन सन्मान

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम. 24 }माझ्या जडणघडणीत शिरूरचे योगदान महत्वाचे असून शिरूरची ही लेक पुण्याचा विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पुण्याचा महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी शिरूर येथे दिली.

शिरूर  नगरीच्या कन्या सौ. मंजुषा दीपक नागपुरे (परदेशी) यांची पुण्यनगरीच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल शिरूर येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार व मानपत्र प्रदान कार्यक्रम  यशवंतराव चव्हाण सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान शिरूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. उद्योपती तथा प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धारिवाल, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे   नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, भाजपचे नेते नोटरी धर्मेंद्र खांडरे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी चे अध्यक्ष राजेंद्र कोरेकर,उपनगराध्यक्ष मितेश गादिया, रतनसिंग परदेशी, शिरूर नगरपरिषद सभापती डॉ. सुनीता पोटे,  सभापती स्वाती साठे, सभापती सय्यद, उपसभापती स्वप्ननाली जामदार, नगरसेवक संतोष थेऊरकर, सागर नरवडे, निलेश पवार, अभिजित पाचर्णे, राजेंद्र लोळगे,  नगरसेविका  सुनीता कुरुंदळे, पूजा पोटावळे, सुनीता भुजबळ,, सविता राजापुरे, स्वीटी शिंदे माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, माजी नगरसेवक   प्रकाश धाडीवाल, मंगेश खांडरे, प्रवीण दसगुडे, भाजपचे बाबुराव पाचंगे, केशव लोखंडे, निलेश नवले राजू शेख,तसेच प्रकाश बाफना, सुनील धाडीवाल  पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे शहा,प्राचार्य डॉ. समीर ओंकार, माजी मुख्याध्यापक इंद्रजित कळमकर, प्रा. चंद्रकांत धापटे,, सुनील करळे, प्रा. शशिकांत जाधव, प्रा. डॉ. क्रांती पैठणकर, डॉ. केत, अविनाश घोगरे, प्रा. चैतन्य वाघ, जयवंत साळुंखे, उदय निकम, मनोज तातेड, प्रवीण गायकवाड, शितल नहार, श्रेणिक नहार,  रमणलाल भंडारी,आदी मान्यवर  यावेळी उपस्थित होते.

शिरूरच्या लेकीला पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदाचा मान मिळताच शिरूर शहरात आनंद, अभिमान आणि भावनिक वातावरण दाटून आले आहे. शिरूरची कन्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी निवड होताच शिरूरकरांचा ऊर अभिमानाने भरून आला.पूर्वाश्रमीच्या मंजुषा परदेशी यांचे महाविद्यालयीन शिक्षण शिरूर शहरातच झाले. येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी नोकरीही केली. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या मंजुषा नागपुरे या दिवंगत बेबी परदेशी व श्री.रतनसिंग परदेशी यांच्या कन्या तर दिवगंत किशोर परदेशी यांच्या भाची होत.

सत्काराला उत्तर देताना नागपुरे म्हणाल्या की आई कडून समाज सेवा व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा संस्कार मिळाला. मुलांनी आपल्या आई वडिलांना आदर्श मानून काम करावे. शिरूर शहराचे नाव कामाच्या माध्यमातून मोठे करत राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्या मनोगता दरम्यान दिवगंत मातोश्री बेबीताई उर्फ मायादेवी परदेशी व मामा किशोर परदेशी यांच्या आठवणीने त्यांच्या कंठ दाटून आला.

उद्योगपती प्रकाश धरिवाल म्हणाले की शिरूरच्या कन्या  पुण्याची  महापौर झाली याचा  सर्व शिरूरकराना आनंद झाला आहे.

माजी आमदार पोपटराव गावडे यांनी पुणे हे विद्येचे माहेरघर असून मोठे शहर आहे या शहराचे महापौर पद शिरूरच्या कन्येला मिळाले आहे. पीएमपीएल ची बस सेवा मलठण  गावापर्यंत सुरू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

धर्मेंद्र खांडरे म्हणाले की दीपक नागपुरे व मंजुषा नागपुरे यांनी प्रामाणिक पणे व निष्ठेने पक्षाचे व सर्वसामान्य माणसांची कामे केली. नागपुरे त्यांच्या कार्यकाळात विविध विकास कामे मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

oplus_131074

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदीप बारवकर यांनी केले.कर्तृत्व, चिकाटी आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी पुण्यासारख्या महानगरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सिंहगड रोड परिसरातून त्या तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, यंदा त्यांची बिनविरोध निवड झाली व  आता महापौरपदाचा सन्मान ही शिरूरच्या लेकीला मिळाला हा शिरूरकरांचा मोठा सन्मान झाला आहे. शिरूरच्या मातीतून घडलेली ही नेतृत्वकथा आता पुण्याच्या कारभाराला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी सूत्रसंचालन माधव मुंडे यांनी केले तर आभार संजय बारवकर यांनी मानले. यावेळी  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे बाळासाहेब झाडगे, रुस्तुम सय्यद, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, कन्हैया दुगड सुधाकर ओतारी दत्ता अभंग, संतोष शेजवळ सतीश गवारी, नितीन बारवकर, सागर परदेशी, विशाल गांधी, रफिक शेख, बाबाजी गलांडे,आप्पासाहेब शेजवळ, सौदागर, टिकू ओस्तवाल, ,आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button