Uncategorized

लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त शिरूर येथे अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन करताना पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व मुख्याधिकारी प्रीतम पाटील व अन्य मान्यवर

शिरुर दिनांक( डेली न्यूज पोस्ट टीम -24)साहित्यरत्न
डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे शिरुर शहरात स्मारक  करण्यासाठी जागेचा शोध घेण्याचे काम सुरु असून जागा उपलब्ध झाल्यावर स्मारकाचा प्रस्ताव तयार करण्यात येईल असे आश्वासन शिरुर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिले .
लोकशाहीर डॉ . अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शिरुर येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती शिरूर शहर व तालुकाचा वतीने पुणे अहिल्यानगर महामार्गावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्याधिकारी पाटील म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शिरूर शहरात स्मारक करण्यासाठी जागेचा शोध सुरु असून जागा उपलब्ध झाल्यावर तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल . आण्णाभाउ साठे यांचा साहित्याचा अभ्यास करावा असे आवाहन ही त्यांनी केले .
पोलीस नि्रीक्षक संदेश केंजळे म्हणाले की सयुंक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान राहीले आहे .
जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, चेतन साठे, अश्विनी कर्डीले, विशाल जोगदंड, योगेश जामदार, प्रा.सतीश धुमाळ आदीची मनोगते झाली.
यावेळी जयंती उत्सव समितीचे दादाभाऊ लोखंडे , सतीश बागवे, अविनाश साबळे, प्रताप शेंडगे,
सोनू काळोखे , नितीन काळे , अविनाश साबळे , नानु भवळ , मयूर भोसले , भाऊ जाधव , अविनाश शिंदे,
राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार , माजी नगरसेवक मंगेश  खांडरे,माजी सभापती संतोष शितोळे , माउली शेलार , मनसेचे ॲड .स्वप्ननील माळवे , ग्रामपंचायत सदस्या मोनिका जाधव , आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव ,सागर नरवडे , सुशांत कुटे ,तारुअक्का पठारे, आदी उपस्थित होते. रक्तदान शिबीराचे ही आयोजन करण्यात आले होते.
सूत्र संचालन संजय बारकवर यांनी तर आभार विशाल जोगदंड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button