विशेष

विद्यार्थ्यांत एआयबाबत जनजागृती; वेदपाठक इन्स्टिट्यूटचा उपक्रम

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञानाशी सुसंगत राहावे यासाठी शिरूर येथील वेदपाठक कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावर जनजागृती अभियान राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे २५ ते ३० शाळांना भेट देत दहावीच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली.
या अभियानात विद्यार्थ्यांना एआयचा शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील करिअरमध्ये कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभ्यासासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर कसा करावा, माहिती शोधणे, प्रेझेंटेशन तयार करणे आणि सर्जनशील कामे सोप्या पद्धतीने कशी करता येतात

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांतजी बाफना यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
या कार्यक्रमात पुण्यातील प्रा. विजय नवले, डॉ. एल. डी. देशमुख, प्रा. प्रशांत टेंबरे आणि प्रा. दिगंबर ढोकले यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अतिवापराबाबतही जागरूकता करण्यात आली. मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यास, मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे २० शाळांतील प्राचार्यांनी ‘आदर्श प्राचार्य’ म्हणून संस्थेचे कौतुक करत सन्मानही केला. या कार्यक्रमाला विविध शाळांतील मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकांची उपस्थिती होती.
केंद्रप्रमुख संजय वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पियुष वेदपाठक, यश नेवसे आणि सिद्धार्थ शेवंते यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य दिशा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button