विशेष
आषाढी एकादशीनिमित्त शिरुर मध्ये विविध शाळांच्या दिंडी सोहळा रंगला
शिरूर दिनांक ( वार्ताहर ) शहरातील विविध शाळांनी आषाढी एकादशी निमित्त शिरूर शहरात दिंडीचे आयोजन केले होते. त्यामुळे संपूर्ण शहर परिसर भक्तीभाव व हरिनामाचा गजरा मध्ये रमून गेला होता.
ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष व हाती टाळ घेतलेले बाल वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर च्या प्रांगणात वारीनिमित्त पालखीचे रिंगण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते .
पूर्व प्राथमिक विभाग व प्राथमिक विभाग इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विठ्ठल नामाच्या गजरात रिंगण सोहळा पूर्ण केला.त्याच वेळी पाउसाने लावलेली हजेरी व भजनामुळे आधिक उत्साह निर्माण झाला . जणू पंढरपुरच शाळेच्या प्रांगणात अवतरले होते.
चिमुकल्या वारकऱ्यांसोबत पालकांनीही ताल धरला होता.
पूर्व प्राथमिक विभाग व इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाची शाळा भरली हे गीत गायले तर तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
यावेळी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे व शालेय समितीचे अध्यक्ष अनिल बोरा, संस्थेचे सचिव नंदकुमार निकम , तसेच संस्थेचे सदस्य धरमचंद फुलफगर, शिरीष बरमेचा, राजेंद्र भटेवरा, प्रशासकीय अधिकारी संजय देशपांडे व विद्याधाम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे व शाळेच्या प्रचार्या अश्विनी घारू उपस्थित होते .
आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कूल मध्ये ही पालखी दिंडी सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी भजन व अभंगाचे सादरीकरण प्रसिध्द गायक गणेश मराठे , डॉ. शिल्पा घोडे, सुषमा झावरे , डॉ . नूतन क्षीरसागर क्षीरसागर यांनी केले .यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ऱाणीताई चौरे , सरदवाडीचे उपसरपंच सोमनाथ सरोदे , सतिश केदारी , उपस्थित होते .
विशेष मुलांनी व पालकांनी पायी पालखी दिंडी काढली व विठूनामाच्या गजर करत फुगडी खेळत, गाण्यांवर ताल धरत सहभाग घेतला .
जीवन विकास मंदिर संस्थेचा विद्यार्थ्यानी कुकडी वसाहतीतील शाळेतून पालखी व दिंडी सोहळा काढला . विठूनामाचा गजरासह पर्यावरणासरंक्षणाचा संदेश बाल वारक -यांनी यावेळी दिला . कृषिलोक विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक , मुख्याध्यापक गंगाधर तोडमल यावेळी उपस्थित होते .





