Uncategorized

जुने नगरपरिषद इमारतीत घरपट्टी-पाणीपट्टी भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी

नगरसेवक संतोष थेऊरकर, सागर नरवडे, उमेश शेळके व निलेश पवार यांनी दिले निवेदन

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शहरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी जुने नगरपरिषद इमारत येथे घरपट्टी व पाणीपट्टी भरणा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक संतोष प्रभाकर थेऊरकर यांनी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना दूरच्या ठिकाणी जावे लागत असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात रांगेत उभे राहून भरणा करताना नागरिकांना त्रास होत आहे.

जुने नगरपरिषद इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे स्वतंत्र भरणा केंद्र सुरू केल्यास नागरिकांना सहज आणि जवळच्या ठिकाणी कर भरणा करता येईल. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यासोबतच नगरपरिषदेची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली वाढण्यासही मदत होईल, असे थेऊरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर जुने नगरपरिषद इमारत येथे भरणा केंद्र सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या मागणीचे निवेदन दिले. यावेळी सभापती एजाज बागवान, नगरसेवक सागर नरवडे उमेश शेळके, निलेश पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button