
उद्योग, समाजकारण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो, असे शिरूरचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशजी रसिकलाल धारीवाल हे ७ मार्च २०२६ रोजी आपल्या ६२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. कष्ट, दूरदृष्टी आणि माणुसकीच्या बळावर त्यांनी उभारलेली वाटचाल आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.