विशेष
जागतिक महिला दिनानिमित्त शिरूरमध्ये ८ मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिर
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24 )जागतिक महिला दिना निमित्त शिरूर येथील क्रिटिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व प्रसुतीगृह व शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक सागर त्रिंबक नरवडे व नगरसेविका पूजा पुष्कराज पोटावळे यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जीवन विकास मंदिर, कुकडी वसाहत, शिरूर येथे केले आहे.
शिबिरामध्ये प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ .मंजुषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना मोफत आरोग्य सल्ला दिला जाणार आहे.
या शिबिरात महिलांसाठी रक्त तपासणी (ब्लड टेस्ट), ईसीजी तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखर तपासणी अशा विविध मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक सागर त्रिंबक नरवडे व नगरसेविका पूजा पुष्कराज पोटावळे यांनी केले असून अधिकाधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी ८४५९६९५६… व ९३२२४८००७२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





