राष्ट्रीयविशेष

आईच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा; महिला दिनी विद्यार्थ्यांकडून मातांचा सन्मान

आर . एम . धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल येथे ‘सन्मान शक्तीचा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मातांचा सन्मान

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}जागतिक महिला दिनानिमित्त निमित्त शिरूरमधील आर . एम . धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल येथे ‘सन्मान शक्तीचा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मातांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे आईचे असलेले मोलाचे योगदान अधोरेखित करत प्रत्येक वर्गातील प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मातांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचे योगदान दर्शवणाऱ्या प्रेरणादायी चलचित्राने झाली. तळागाळातील संघर्षापासून ते अवकाशातील झेपेपर्यंत महिलांनी केलेल्या कार्याचा आढावा या चलचित्रातून सादर करण्यात आला. हा प्रवास पाहताना उपस्थित महिलांच्या मनात अभिमानाची भावना दाटून आली.

यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या मातांचा सन्मान केला. सन्मानचिन्ह म्हणून सन्मानपत्र व तुळशीचे रोप देण्यात आले. हा सन्मान स्वीकारताना अनेक मातांचे डोळे पाणावले. ‘मुलांचे संगोपन करणाऱ्या महिलांचा प्रथमच असा सन्मान झाला. आज आम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो,’ अशा भावना व्यक्त करत अनेक महिलांनी शाळेच्या प्राचार्या अश्विनी घारू व शिक्षकवृंदाचे आभार मानले.

या उपक्रमाबद्दल शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, शालेय समितीचे अध्यक्ष शिरीष बरमेचा तसेच संस्थेचे सचिव नंदकुमार निकम यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या यशामागे उभ्या असलेल्या मातृत्वाच्या शक्तीला सलाम करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमची छाप सोडून गेला.

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button