Uncategorizedविधेषविशेष

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; महिला दिनानिमित्त प्रेरणादायी सोहळा

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}जागतिक महिला दिनानिमित्त रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रामलिंग (ता. शिरूर) यांच्या वतीने तालुकास्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. बाबुराव नगर येथील डेक्कन स्कूलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, मॉ साहेब जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि गणपती बाप्पा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी या सोहळ्यात कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार म्हणून ट्रॉफी, शाल, नारळ व पुष्पगुच्छ देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.

यावेळी शिरूर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे , सभापती आयेशा सय्यद, सभापती डॉ. सुनीता पोटे, उद्योजि का व माजी सरपंच वर्षा काळे,पंचायत समिती सदस्या स्वाती घावटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष शामकांत वर्पे , डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्कूलचे प्राचार्य समीर ओंकार, केशव शिंदे शीतल शर्मा, सुभाष शेटे यांच्यासह शिक्षकवृंद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या कार्यक्रमात स्वाती घावटे, वर्षा काळे, शिक्षिका जयश्री दांडगे, गीता आढाव, डॉ. कल्याणी शेटे, अॅड. पल्लवी येवले, गौरी रासकर तसेच सरस्वती महिला बचत गट (रामलिंग, ओम रुद्रा कॉलनी) यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब असून यामुळे इतर महिलांनाही पुढे येऊन समाजकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा नरवडे यांनी केले. ज्येष्ठ बातमीदार सुभाष शेटे यांचे यावेळी मनोगत झाले. संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button