निधन वृत्तराष्ट्रीय

प्रयोगशील शेतकरी व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बाफना यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शहरातील प्रसिद्ध व्यापारी, प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी तसेच शिरूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत सोभाचंद बाफना (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिरूर शहरात हळहळ व्यक्त होत असून व्यापारी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, पाच भाऊ, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.बाफना यांनी शिरूर शहरातील शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे ते पदाधिकारी होते. संस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम पाहिले. तसेच ते जैन विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य होते. सकल ओसवाल जैन समाजाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावली.

अभ्यासू, सुसंस्कृत आणि समतोल विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. शिरूर शहराजवळील त्यांच्या शेतीत ते शेतीविषयक विविध प्रयोग करत असत. त्यांच्या प्रयोगशील शेतीची माहिती घेण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असत. ते लायन्स क्लब ऑफ शिरूरचे माजी अध्यक्षही होते. विविध विषयांवरील त्यांचे सखोल वाचन आणि अभ्यास प्रसिद्ध होता.

व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाफना, बांधकाम व्यावसायिक संजय बाफना, मंगल अनिल धाडीवाल व किरण बरडिया यांचे ते वडील होत. माजी मंत्री मदन बाफना यांचे ते बंधू होत. तसेच ॲक्टिव्ह सोशल ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफना यांचे ते सासरे होत.कविश बाफना त्यांचे पणतू होत.

त्यांची अंत्ययात्रा सोमवार (दि. ९ मार्च) रोजी सायंकाळी ५ वाजता राम आळी, घोडनदी येथून निघून अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाईल.

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button