Uncategorized
पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती घावटे यांची तर उपसभापतीपदी रामभाऊ सासवडे यांची बिनविरोध निवड

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिरूर पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती घावटे यांची तर उपसभापतीपदी रामभाऊ सासवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवड निर्विरोध झाली.
मागील महिन्यात झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेत ८ जागांवर विजय मिळवला होता. तर भारतीय जनता पक्षाला ५ जागा मिळाल्या असून एक अपक्ष सदस्य निवडून आला आहे. पंचायत समितीच्या एकूण १४ जागा आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्रितपणे लढवल्या होत्या.
यंदा पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाती घावटे यांनी सभापतीपदासाठी तर रामभाऊ सासवडे यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून सभापतीपदासाठी मनीषा सतीश पाचंगे तर उपसभापतीपदासाठी सागर देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत पाचंगे आणि देवकर यांनी माघार घेतल्याने स्वाती घावटे व रामभाऊ सासवडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.







या निवडीमुळे शिरूर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे.
स्वाती घावटे या शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणातून निवडून आल्या आहेत तर रामभाऊ सासवडे हे शिक्रापूर पंचायत समिती गणातून निवडून आले आहेत.