क्राईम
शेती मशागतीची अवजारे चोरीला – शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर -निर्वी ता. शिरूर येथे शेतातील अवजारे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश गुलाब टिंगरे (वय ३५, रा. विश्रांतवाडी, धानोरी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्या निर्वी येथील गट क्रमांक 594 मधील शेता तील रूमसमोर ठेवलेली शेती मशागतीची दोन अवजारे – 60 हजार रुपयांचे हायड डबल रिव्हर्सीबल प्लग (45 एचपी कंपनीचे नांगर) व 25 हजार रु नांगर असा एकूण ८५ हजार रुपयांचा माल चोरीला गेला.
यासंदर्भात पोलिस हवालदार खेडकर यांनी गुन्हा दाखल केला आहे . प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोरे हे करीत आहेत.