क्राईम

संगनमताने 1 कोटी 84 लाख 66हजार 658 रु. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांचा विरोधात तक्रार दाखल

  1. शिरूर( टीम डेली न्यूज पोस्ट 24 ) प्लांटमध्ये पार्टनर घेउन त्यामधून येणारा नफा तुम्हाला देउ असे खोटे नाटे सांगून विश्वास संपादन करत संगनमताने 1कोटी 84 लाख 66हजार 658 रु. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांचा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
    याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता अशोक मेसे वय 48 वर्ष, व्यवसाय टेलरिंग, रा. स्वामी छाया फेज 2, फ्लॅट नं 19, विठ्ठल नगर, शिरूर, जि. पुणे यांनी 1) सुनिता राहुल भांगे 2) राहुल नवनाथ भांगे, 3) ऋषी नवनाथ भांगे रा. केसनंद रोड, वाघोली मूळ रा. अरणगाव, ता. केज, जि. बीड यांचा विरोधात तक्रार दिली आहे .
    १ ऑक्टोबर २०२२ ते १८ मार्च २०२५ दरम्यान सुनिता राहुल भांगे व राहुल नवनाथ भांगे, ऋषी नवनाथ भांगे सर्व रा. केसनंद रोड, वाघोली मूळ रा. अरणगाव, ता. केज, जि. बीड यांनी सविता मेसे यांच्या विठ्ठल नगर येथील घरी येउन सविता मेसे यांना भांगे हे वाटाणा सोलने व पनीर तयार करण्याचा प्लांट टाकणार आहे . त्याकरिता आम्हाला पैशांची गरज आहे. तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुम्हाला त्या प्लांटमध्ये पार्टनर घेउन त्यामधून येणारा नफा आम्ही तुम्हाला देउ असे खोटेनाटे सांगून मेचे व मेचे यांच्या मैत्रीणीचा विश्वास संपादन करून संगनमताने एकूण 1,84,66,658 रुपये एवढी रक्कम स्वंत :च्या फायदयाकरिता घेवून आपली व  आपल्या मैत्रीणीची आर्थिक फसवणूक केली असल्याचे तक्रार मेचे यांनी केली आहे . पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय झेंडगे करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button