अपघात

कंटेनर व स्विफ्ट कारचा अपघातात तीन जण मृत्युमुखी .

अपघातात बाप लेकीचा मृत्यु


शिरुर दिनांक ( वार्ताहर )
न्हावरा – तळेगाव रस्त्यावर न्हावरा , ता शिरुर येथे झालेल्या स्विफ्ट व कंटेनरचा अपघातात बाप व मुली सह तीन जणांचा मृत्यु झाला असून एक जण गंभीर जखमी झाले आहेत . बाप लेकीचा मृत्युने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
अपघातात कैलास कृष्णाजी गायकवाड ( वय – ४९ वर्ष ) , गौरी कैलास गायकवाड ( वय -२० वर्ष ) दोघे ही राहणार -निंबाळकर वस्ती , ,न्हावरा , ता . शिरुर जि पुणे व गणेश महादेव निर्लेकर( वय -२५ वर्ष ) रा . कोकणगाव , ता . श्रीगोंदा , जि . अहिल्यानगर हे मरण पावले .तर दुर्गा कैलास गायकवाड वय – ४८ वर्ष या गंभीर जखमी झाल्या आहेत .
यासंदर्भात रविंद्र महादेव सोनवणे वय -३८ वर्षे , रा ,कुटेवस्ती, न्हावरे ता. शिरूर, जि. पुणे यांनी कंटेनर ट्रक नं. एन. एल. ०५ – जी. २३९६ वरील अज्ञात चालका विरोधात फिर्याद दिली आहे .
२३ मार्च रोजी रात्री कैलास कृष्णाजी गायकवाड हे त्यांची पांढरे रंगाची स्विफ्ट कार गाडी नं. एम.एच.१६ सी. व्ही. ४१७६ मधून पत्नी दुर्गा कैलास गायकवाड , मुलगी गौरी कैलास गायकवाड व चुलत मेव्हणे गणेश महादेव नेर्लेकर याना घेवून वाघोली पुणे येथून न्हावरे कडे येत असताना ते तळेगाव ते न्हावरे रोडने संदिप महादेव सरके यांचे घराशेजारी रोडवर आल्यावर समोरून न्हावरे बाजुकडून तळेगाव कडे जाणारा कटेनर ट्रक नं एन. एल. ०५ – जी. २३९६ वरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील कटेनर अविचाराने, हयगयीने, निष्काळजीपणाने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जोरात चालविल्याने समोरून येत असलेल्या स्विफ्ट कारला जोरात धडक दिली. अपघातात कार चालक कैलास कृष्णाजी गायकवाड , गौरी कैलास गायकवाड वय 20 वर्षे , गणेश महादेव नेर्लेकर वय 23 वर्षे रा. कोकणगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर हे मरण पावले . तर दुर्गा कैलास गायकवाड वय- ४५ या गंभीर जखमी झाल्या आहेत . दोन्ही वाहनाचे अपघातात नूकसान झाले .अपघाताचा आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोते करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button