क्राईम

रागावल्याच्या कारणावरून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन दिल्या पालकांच्या ताब्यात; शिरूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) शिरुर  शहरामधून दिनांक १६मे २०२५ रोजी व दिनांक १७ मे २०२५ रोजी दोन अल्पवयीन मुली त्यांचे राहते घरातून कोणासस काही एक न सांगता निघून गेल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
याबाबत  शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३३४/२०२५ व ३३९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हे दाखल करून या दोन्ही गुन्ह्यांचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे  यांनी तात्काळ  गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून मुलींचा शोथ घेण्याबाबत आदेश दिले होते. सदरच्या दोन्ही अल्पवयीन मुलींकडे कुठलाही मोबाईल नसल्याने व त्यांना कोणी नेले असावे व कशामुळे नेले असावे याबाबत पालकांना देखील माहिती नसल्यामुळे तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पो. स्टे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांचे आधारे सदरच्या दोन्ही मुलींचा शोध घेऊन दोन्ही मुली दिनांक १८ मे २०२५ रोजी त्यांचे पालकांचे ताब्यात दिल्या आहेत. तसेच निघून गेलेल्या दोन्ही मुलीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे पालकांशी झालेल्या भांडणाचे किरकोळ कारणावरून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याबाबत तपासात सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.

हा तपास  पोलीस अधिक्षक संदिप गिल , अप्पर  पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय अधिकारी  प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे  , शिरूर पो स्टे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार दीपक राउत, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, सचिन भोई, नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील, रवींद्र आव्हाड, अशोक वितारे, महिला पोलीस अंमलदार गोदावरी धंदरे, महिला पोलीस अंमलदार कल्याणी कोडवते यांचे पथकाने केला .

बांधकाम व्यवसायिक राजेंद्र देशमुख यांना डेली न्यूज पोस्ट टीम -२४ च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button