महाराष्ट्र
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुरुष महिला, युवक, युवती आघाडीची तातडीची बैठक रविवार, 21 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा दक्षिण अध्यक्ष अंकुश लांडे तसेच पुणे जिल्हा महिला दक्षिण अध्यक्षा शैलेजा दुर्गे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे यांनी दिली आहे.
मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करून आगामी संघटनात्मक उपक्रमांचे नियोजन या बैठकीत करण्यात येणार आहे. शिरूर तालुक्यातील पुरुष, महिला, युवक व युवती पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
