राष्ट्रीय

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार, बेकायदेशीर साठा तसेच ग्राहकांकडून जादा दर आकारण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी शिरूर तहसील प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अशा गैरप्रकारांत आढळणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिला आहे.

तहसील कार्यालयाकडून सर्व गॅस एजन्सी धारक तसेच नागरिकांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार करणे, बेकायदेशीर साठा करून ठेवणे, ग्राहकांकडून ठरावीक दरापेक्षा जादा पैसे आकारणे तसेच घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी पुरवठा करणे अशा प्रकारांवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा गैरप्रकारांमध्ये कोणीही आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ तसेच एलपीजी (पुरवठा व वितरण नियमन) आदेश २००० अंतर्गत थेट फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दोषींवर कायद्यानुसार शिक्षा होईल, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर होत असल्याची माहिती आढळल्यास तातडीने तहसील कार्यालय किंवा संबंधित प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांतजी बाफना यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button