विशेष

शिरुर शहरास उद्या शुक्रवार दि .२८ मार्च पासून नियमित पाणीपुरवठा

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )शिरुर शहरास दिनांक २० मार्च २०२५ पासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. तो पाणीपुरवठा उद्या शुक्रवार दि .२८ मार्च २०२५ पासून नियमित करण्यात येणार आहे .
शिरुर शहराला करण्यात येत असलेल्या कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-यातील पाणीसाठा अत्यंत कमी प्रमाणात शिल्लक राहिल्याने   गुरुवार दि. २० मार्च पासून शिरुर नगरपरिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेतुन शहरास एक दिवसाआड पुरवठा केला जात होता.  दरम्यान शिरूर शहरा करिता पाणीपुरवठा करण्यासाठी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यामध्ये कुकडी विभागा मार्फत पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे उद्या शुक्रवार, दिनांक 28 मार्च 2025 पासून शहरातील पाणीपुरवठा दररोज पूर्ववत वेळेवर होणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button