Uncategorizedधार्मिंक

विश्वशांतीसाठी शिरूरमध्ये ‘विश्वप्रार्थना’ जपयज्ञ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विश्वशांती आणि मानवकल्याणासाठी शिरूरमध्ये ‘विश्वप्रार्थना’ जपयज्ञाचे आयोजन करण्यात आले. जीवनविद्या मिशनच्या शिरूर ज्ञानसाधना केंद्रामार्फत शिवसेवा मंडळ महादेव मंदिर येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.

विश्वसंत सदगुरू श्री वामनराव पै यांच्या प्रेरणेने ‘हे जग सुखी व्हावे व हिंदुस्तान राष्ट्र सर्वार्थाने प्रगत व्हावे’ या उदात्त ध्येयातून या प्रार्थना जपयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. “सर्वांना चांगली बुद्धी, आरोग्य, सुख आणि कल्याण लाभावे” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

या जपयज्ञात शिरूर शाखेतील नामधारकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अहिल्यानगर येथील शंकरदादा गणगे, महेश रासने, शामकांत वर्पे यांच्यासह आशिष जावळे परिवार, संजय बढे व परिवार, अनारसे सर, महेश कोकरे, शितोळे सर, इंद्रभान गायकवाड, सुभाष चोरडिया आदींसह अनेक महिला-पुरुष उपस्थित होते.

शिरूर शाखेचे अध्यक्ष रोहिदास काळे, खजिनदार बाळासाहेब गुंजाळ आणि चंदना लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या जपयज्ञामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button