महाराष्ट्र

शिरूर शहरातील नगरपरिषद हद्दीतील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर शहरातील नगरपरिषद हद्दीतील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

शिरूर नगरपरिषद हद्दीतील वाडा वसाहत येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व ड्रेनेज लाईन, रेव्हेन्यू कॉलनी येथील सेंटर हॉस्पिटल समोरील श्री. थोरात घर ते नवले घर रस्ता काँक्रिटीकरण व इतर अनुषंगिक कामे  , सुशीला पार्क येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील उपनगराध्यक्ष मितेश गादिया, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, स्वच्छता व आरोग्य समितीचा सभापती एजाज बागवान, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, नियोजन व विकास गृहनिर्माण, टपरी व झोपडपट्टी पुनर्वसन समिती सभापती स्वाती साठे

 ,महिला व बालकल्याण समिती सभापती आयेशा सय्यद, उपसभापती स्वप्ननाली जामदार,नगरसेविका चारुशीला कोळपकर,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक सागर नरवडे, अमित कर्डीले, निलेश पवार, अभिजित पाचर्णे, निलेश गाडेकर, संतोष थेऊरकर, अमोल चव्हाण, नगरसेविका पुजा पोटावळे, स्वीटी शिंदे, संगीता मल्लाव आदी सह कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, पंकज काकड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद पवार कालेवार, श्रुतिका झाबरे, निखिल केदारी, सूरज पाचंगे आदी यावेळी उपस्थित होते.

बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव यांनी सांगितले की शिरूर शहरात विविध विकासकामांचे नियोजन करुन विकासकामे सुरु करण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button