Uncategorizedनिधन वृत्त
आदर्श केश कर्तनालयाचे चंद्रकांत सीताराम वाघमारे यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील जुन्या पिढीतील हुडको वसाहतीमधील नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व आदर्श केश कर्तनालयाचे चंद्रकांत सीताराम वाघमारे वय – 80 वर्ष यांचे निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
वाघमारे यांचे आदर्श केश कर्तनालय हे सलूनचे प्रसिद्ध दुकान असून विविध धार्मिक व सामाजिक कार्यात त्याच्या सहभाग असायचा

व्यवसायिक संदीप वाघमारे, बोरा महाविद्यालयातील अधिकारी प्रदीप वाघमारे यांचे ते वडील होत.
अंत्ययात्रा -सोमवार दिनांक ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजता हुडको कॉलनी शिरूर येथून अमरधाम स्मशानभूमी येथे जाईल.






