राष्ट्रीय
दानशूर उद्योगपती स्व. रसिकलालजी धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर सायंकाळी चार पर्यत १३०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान



-

रक्तदान शिबीरात ३५ वे रक्तदान करताना पुष्पककुमार सुकुमार बोरा




शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}दानशूर उद्योगपती स्व. रसिकलालजी धारीवाल यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त प्रकाशभाऊ धारीवाल मित्र मंडळ, शिरूर शहर व पंचक्रोशीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या शिबिरात सायंकाळी पावणेचारपर्यंत तब्बल १३०० हून अधिक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय, जि. पुणे येथे हे शिबीर संपन्न झाले.
यावेळी दिवगंत उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगरध्यक्ष प्रकाश धारिवाल, युवा उद्योजक आदित्य धारिवाल, दिनाभाभी धारिवाल, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे,उपनगराध्यक्ष मितेश गादिया, पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता अशोक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे,
शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी नगरसेवक विजय दुगड, प्रकाश धाडीवाल, रक्ताचे नाते संस्थेचे प्रमुख रामभाऊ भांगड, सतीश धाडीवाल, सुनील धाडीवाल, विनोद धाडीवाल, व्यवसायिक अनिल बिहाणी, संदीप बिहाणी, रमेश कर्नावट, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, राजेंद्र क्षीरसागर, यांच्यासह आजी माजी नगरसेवक, माजी सभापती संतोष शितोळे, तुकाराम खोले, प्रशांत शिंदे,
किरण बनकर, सुशांत कुटे, महिबूब सय्यद, अनिल बांडे, प्रा. डॉ. राजेराम घावटे आदी सह राजकीय व सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चार हून अधिक रक्तपेढी यांनी यावेळी रक्त संकलन केले.शिबीरात रक्ताचे नाते संस्थेचे रामभाऊ भांगड यांनी १८२ वे, व्यवसायिक अनिल बिहाणी यांनी १०१ वे अनिल बांडे व अशोक गांधी यांनी ७२ वे, पुष्पक सुकुमार बोरा यांनी ३५ वे रक्तदान केले. माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांनी शिबीरात सर्वात प्रथम रक्तदान करीत ३१ वे रक्तदान केले.आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक देवल शहा व एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले मिहीर शहा या बाप लेकाने संकेत चंद्रकांत चोपडा व वैष्णवी चोपडा या पती पत्नीने तर आदेश धाडीवाल व निलेश धाडीवाल या बंधूनी रक्तदान केले.
या शिबिराचे हे नववे वर्ष आहे. मागील वर्षी १,२४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. गेल्या आठ वर्षांत या शिबिराने शिरूर परिसरात सामाजिक रक्तदान चळवळीला नवी दिशा दिली.
या उपक्रमाअंतर्गत रक्तदान करणाऱ्या ८७ भाग्यवान विजेत्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे.स्व. रसिकलालजी धारीवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम दरवर्षी राबविला जात असून, समाजहिताची परंपरा जपण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे आयोजकांनी नमूद केले.




