महाराष्ट्रविशेषशैक्षणिक
Related Articles
(no title)
52 minutes ago
Check Also
Close

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ८१ व्या वर्धापनदिनानिमित्त व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून झालेल्या सन्मानाबद्दल विशेष कार्यक्रमाचे आयोजन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात करण्यात आले होते.

प्रकाश धारिवाल म्हणाले की संस्थेने ८१ वर्षाच्या टप्प्या पूर्ण केला आहे . यात शिक्षक व संस्थेचे विश्वस्त, विद्यार्थी यांचे ही योगदान महत्वाचे आहे.शिरूर परिसरात औद्योगिककरण वाढत आहे. पुणे नगर रस्त्यावरील महत्वाचे शहर शिरूर असून विदयार्थी संख्या ही वाढत आहे. शिरूर शिक्षण संस्थेचा विस्तार मोठा झाला असून ११ शाळा व एक महाविद्यालय संस्थेचे आहे. संस्थेत १९ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. 
ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देणारी ही संस्था आहे. काळ बदलत आहे विदयार्थ्यांचे प्रश्न व स्वप्न बदलत आहे.त्यानुसार काळानुसार,बदलत्या परिस्थिती नुसार सर्वांना बदलावे लागणार आहे. संस्थेत नवीन कोर्सेस सुरु करण्यात येणार असून आयआयटी कोर्सेस सुरु करण्यात आले आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना किमान एक परकीय भाषा शिकता यावी यासाठी पुढील वर्षांपासून ऑनलाईन फ्रेंच व जर्मनी भाषा शाळामधून शिकविण्यात येणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षण ही देण्यात येणार असल्याचे निकम यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्था काम करीत आहे.



