Uncategorized

पोलिसांची मोठी कारवाई, 25 किलो अमली पदार्थ (गांजा)  जप्त; तीन जण अटकेत

 

शिरूर  (डेली न्यूज पोस्ट टीम -24) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर  पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे. एका मारुती इको गाडीतून सुमारे 25 किलो 642 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ ( गांजा )वाहतूक करताना तीन जणांना  अटक करण्यात  आली  आहे.

​याबाबत पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार,  अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस हवालदार महेश मनोहर गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:00 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर ते पुणे महामार्गावरील शिंदे वसाहतीजवळ पोलीस पथकाने सापळा रचला. यावेळी संशयित मारुती इको (क्र. एम एच 12 आर एफ 7114) गाडीला थांबवून तपासणी केली असता, गाडीत मोठ्या प्रमाणात अमली (गांजा)  पदार्थ आढळून आला.

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य चंदुलालजी बुधमलजी चोरडिया यांना 81 वाढदिवसानिमित्त डेली न्यूज पोस्ट च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

​याप्रकरणी पोलिसांनी वाशिम अब्दुल सय्यद (वय 35), मुबशीर उर्फ जिमी मन्सूर खान (वय 27) आणि राहुल रामदास कणगरे (वय 26), सर्व राहणार स्टेशन रोड, दत्तनगर, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेतले आहे.

​आरोपींविरोधात रांजणगाव  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार स.पो.नी चव्हाण यांनी आरोपींविरुद्ध NDPS ऍक्ट कलम 8(c), 20(b)ii(c), 29 नुसार कायदेशीर कारवाई केली आहे. पुढील तपास अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूरचे स.पो.नी शिंदे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button