शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिरूर शहरातील सामाजिक, शैक्षणिक व जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कै. अॅड. ओमप्रकाश बन्सीलाल सतीजा (वय ७१) यांचे रविवारी (दि. १९ एप्रिल) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिरूर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष, लोकशाही क्रांती आघाडीचे उपाध्यक्ष तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, शिरूरचे सचिव आणि कृषिलोक विकास संशोधन संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांनी विविध क्षेत्रांत सक्रिय योगदान दिले. मितभाषी, अभ्यासू व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
“आता सहवास नसला तरी, स्मृती सुगंध देत राहील; जीवनाच्या प्रत्येक वळणावर, आठवण तुमची येत राहील,” अशा भावपूर्ण शब्दांत ग्रामस्थ व मित्रपरिवाराने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, कै. सतीजा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज मंगळवार (दि. २१ एप्रिल) रोजी सायंकाळी ५.३० वाजता जैन पंचायत भवन, शिरूर (शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयासमोर) येथे जाहीर शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त ग्रामस्थ व नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.