धार्मिंकविशेष

शिरूर शहरात प्रभू परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}
भगवान विष्णूचा सहावा अवतार आणि ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू परशुराम यांचा जन्मोत्सव शिरूर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र ब्राह्मण सभा, शिरूर शाखेच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभू परशुराम यांच्या मूर्तीस अध्यक्ष चैतन्य वाघ व अक्षता वाघ यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला. पौरोहित्य सारंग प्रयाग गुरुजी यांनी केले. यानंतर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेविका पूजा पोटावळे, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी,प्राचार्य विनायक म्हसवडे, डॉ. विश्वास मुळे यांच्यासह ब्राह्मण समाजातील मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात काशी येथील प्रवचनकार परमेश्वर महाराज दंडवते यांनी प्रभू परशुराम यांच्या जीवनकार्यावर प्रभावी प्रवचन केले. त्यांनी परशुरामांनी दिलेल्या नीतिमूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.
यावेळी ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. समीर ओंकार यांनी केले, तर आभार श्री. अतुल पाठक यांनी मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत जोशी, अनघा पाठक, निरंजन कुलकर्णी, शिवम पाठक यांनी केले.
या प्रसंगी हिंदी भाषिक ब्राह्मण समाजातील हरीश शर्मा, सौ. नीलू शर्मा, प्रेमकुमार मिश्रा, निर्पेश पाठक यांच्यासह शिरूर शहर व परिसरातील ब्राह्मण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button