महाराष्ट्र
शिरूर शहरात जागतिक पुस्तक दिनानिमित्त माजी प्राचार्य पद्माकर पुंडे यांचे आज गुरुवार दिनांक २३ एप्रिल रोजी व्याख्यान
शिरूर,{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: “पुस्तकं आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावं लागतं,” या आशयाचा संदेश देत जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिरूर शहरात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरूर नगरपरिषद आणि शिरूर रिक्रिएशन क्लब अॅन्ड लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने “मुक्तद्वार वाचनालय” अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या व्याख्यानाचा विषय “शेक्सपिअरच्या नाटकातील आपली माणसे” असा असून, प्राचार्य पद्माकर पुंडे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. इंग्रजी विषयातील त्यांचे सखोल अध्ययन व व्यासंग लक्षात घेता, शेक्सपिअरच्या साहित्याचा वेध घेताना मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडून दाखवले जाणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सुभाष प्रतापराव पवार राहणार आहेत. तसेच आयोजनात श्री. रविंद्र धनक, मुहम्मद हुसेन पटेल, डॉ. दिपक गायकवाड, प्रा. सतिश धुमाळ व ग्रंथपाल सौ. कल्पना काकडे यांचा सहभाग आहे.
हा कार्यक्रम शिरूर नगरपालिका ग्रंथालय इमारत, रामआळी येथील सभागृहात आयोजित करण्यात आला असून, वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
