विशेष
व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वा.
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार (दि. 29 मार्च) रोजी सायंकाळी पाच वाजता साई गार्डन मंगल कार्यालय, बोरा कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा, सचिन पूजा पोखरणा, संचालक सुवालाल पोखरणा, विश्वस्त आदित्य पोखरणा व आदिती पोखरणा आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका पसक्कीन कासी व मुख्याध्यापक संतोष येवले यांनी दिली.
वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांकडून नृत्य, गायन, वादन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार असून, पालक व नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे.








