महाराष्ट्रविशेषशैक्षणिक

पिढी घडविण्याचे काम शिक्षक करतात : माजी प्रचार्य डॉ. गोविंद राजेनिंबाळकर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}पिढी घडविण्याचे काम शिक्षक करतात व विद्यार्थ्यांचे ते आयडॉल असतात असे सांगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मधील कूतहल आणि प्रयोगशील वृत्ती कशी वाढेल याबाबत प्रयत्न करावेत असे आवाहन माजी प्राचार्य डॉ. गोविंद राजेनिंबाळकर यांनी केले.

येथील. ज्ञानगंगा विश्व् विद्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘ शिक्षण पद्धती व त्यापुढील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यान माजी प्राचार्य निंबाळकर यांचे झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगा एज्यू केशन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेराम घावटे होते.
संस्थेच्या संचालिका अमृता घावटे, संचालक सुधीर शिंदे, मुख्याध्यापक देशमुख, गौरव खुटाळ, सुनंदा लंघे, उपमुख्याध्यापिका जयश्री खणसे,  समन्वयक व्ही. डी. शिंदे आदी यावेळी उपस्थित होते .
डॉ. निंबाळकर यांनी सांगितले की, बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीतही परिवर्तन आवश्यक असून शिक्षकांनी स्वतःमध्ये सातत्याने बदल स्वीकारणे गरजेचे आहे. शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान ६ टक्के खर्च अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात हे प्रमाण अपुरे असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण हे  ज्ञान व कौशल्य विकसित करणारे असावे. विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत करून प्रयोगशीलतेला प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते; ती ओळखून शिक्षण देणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना  कृतीतून शिकवावे, लिखाण व निरीक्षण कौशल्य वाढवावे, तसेच परीक्षेतील गुण हेच सर्वस्व नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. कुटुंबातील आजी-आजोबांच्या सहवासामुळे मुलांचा भावनिक विकास अधिक सुदृढ होतो, असेही त्यांनी नमूद केले.
  1. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. राजेराम घावटे यांनी वाचनसंस्कृती वाढविण्याचे आवाहन केले. “बदल स्वीकारा आणि त्यानुसार स्वतःमध्ये परिवर्तन घडवा. संघर्षातूनच खरे जीवन घडते,” असे ते म्हणाले.

    तीर्थरुप पांडुरंगराव मारुतीराव धुमाळ { आबा ) सेवानिवृत्त महसूल कर्मचारी व माजी सैनिक यांना १९ व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
    तीर्थरुप पांडुरंगराव मारुतीराव धुमाळ { आबा ) सेवानिवृत्त महसूल कर्मचारी व माजी सैनिक यांना १९ व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button