महाराष्ट्रविशेषशैक्षणिक
ज्ञानगंगा ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या निकालात अव्वल स्थान
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गंगा एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा ज्युनिअर कॉलेजने यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
सलग उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत संस्थेने शिरूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे संस्थेच्या संचालिका अमृतेश्वरी घावटे यांनी सांगितले .
विज्ञान शाखेतून सोहम वाघमारे याने ८७.६७ टक्के गुण मिळवत संपूर्ण शिरूर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. यश निकाळजे (८५%) द्वितीय, सावर सिकची (८२.८३%) तृतीय, श्लोक गादीया (८२.६७%) चतुर्थ, तर शर्वरी निचीत (८०.८३%) पाचव्या
क्रमांकावर राहिली.
वाणिज्य शाखेत तनिष्का बोरा (८५%) हिने प्रथम, रेवती कनाडे (८४.५०%) द्वितीय, दर्शिता शेळके (८४.५०%) तृतीय, तर ओम जटाले (८१.१७%) चतुर्थ क्रमांक मिळवला.


प्रज्ञा जाधव हिने इंग्रजी विषयात ९० गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, इंग्रजी विषयात सलग चौथ्या वर्षी ज्ञानगंगा कॉलेजचा विद्यार्थी तालुक्यात अव्वल ठरला आहे.

