क्राईम

क्लिनिकमध्ये चोरी अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}कवठे येमाई (ता. शिरूर) येथील एका खासगी क्लिनिकमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे २.६० लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सौ. कल्पना सुभाष पोकळे (वय ४७, व्यवसाय डॉक्टर, रा. कवठे येमाई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत ओम श्री क्लिनिकमध्ये ही चोरी झाली.

फिर्यादीनुसार, क्लिनिकमधील टेबलखाली ठेवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे १८ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ६० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची बांगडी, १.०२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, ७८ हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र तसेच २ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

घटनेच्या वेळी क्लिनिकचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्याने आत प्रवेश केला.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button