स्थानिक

प्रिया बिरादार यांचे उपोषण स्थगित; उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रशासनाचे लेखी आश्वासन”

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम  -24}शिरूर शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेरप्रिया बिरादार यांचे उपोषण  प्रशासनाचे लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.

शिरूर शहर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांनी शिरूर तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आले.

या आंदोलनाला विविध राजकीय, सामाजिक आणि महिला संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला. यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, पंचायत समिती सदस्य दिपक पवार, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे, बापुसाहेब शिवले, माजी सरपंच विठ्ठल घावटे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा वर्षा काळे, आदिशक्ती महिला मंडळाच्या शशिकला काळे, आधार छाया फाउंडेशनच्या सुविता बोरुडे, नगरसेवक निलेश पवार, संतोष थेऊरकर, सागर नरवडे, उमेश शेळके, राजेंद्र लोळगे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा श्रुतिका झांबरे, वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या उषा वाखारे, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज, प्रितेश फुलडाळे, विजय नर्के तसेच सृष्टी करंजुले, सुजाता पाटील, भारती शहाणे, नयना परदेशी, निलमधु शर्मा, कविता परदेशी, जयश्री हार्दे यांसह नागरिक आणि महिलांची मोठी उपस्थिती होती.

तीर्थरुप पांडुरंगराव मारुतीराव धुमाळ { आबा ) सेवानिवृत्त महसूल कर्मचारी व माजी सैनिक यांना १९ व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
तीर्थरुप पांडुरंगराव मारुतीराव धुमाळ { आबा ) सेवानिवृत्त महसूल कर्मचारी व माजी सैनिक यांना १९ व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन

शिरूर शहरासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेबाबत ११ सप्टेंबर २०२५ पासून सातत्याने पाठपुरावा करूनही तहसील कार्यालयाकडून परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. उलट जाणीवपूर्वक चुकीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप प्रिया बिरादार यांनी केला. संबंधित तलाठी, मंडल अधिकारी व इतर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, शहर व तालुक्यातील शासकीय आधार केंद्र तत्काळ सुरू करावे, तसेच सर्व सीएससी केंद्रांवर शासकीय शुल्काचे फलक लावावेत, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि.४ मे) सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.

दरम्यान, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तातडीने दखल घेत तहसील, भूमिअभिलेख, नगरपरिषद आणि ग्रामीण रुग्णालय विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत प्रस्तावातील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ८ मे रोजी संबंधित जागेची मोजणी करून उपजिल्हा रुग्णालयासाठी परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल, असे लेखी आश्वासन सायंकाळी साडेसात वाजता देण्यात आले.

या आश्वासनानंतर प्रिया बिरादार यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. शिरूर शहरात उपजिल्हा रुग्णालय उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत नागरिक, महिला, विविध संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button